August 24, 2024 7:02 PM
21
कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारच्या राजीनाम्याची आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विरोधकांची मागणी
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. या मुद्द्यावर पुकारलेला बंद बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज केवळ निदर्शनं करण्याचा निर्णय मविआने घेतला. ठाण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. या घटनांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्...