August 11, 2024 8:00 PM August 11, 2024 8:00 PM
9
लाडकी बहिण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातून ६ लाख १५ हजार १३६ अर्ज प्राप्त
राज्यशासनाच्यावतीनं सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत विविध ठिकाणाहून जवळपास ६ लाख १५ हजार १३६ अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ५ लाख ४२ हजार ८१९ अर्ज जिल्हास्तरीय समितीनं पात्र ठरवले असून पुढील कार्यवाहीसाठी हे पात्र अर्ज शासनाला सादर करण्यात करण्यात आले आहेत. तर अपात्र ठरलेल्या जवळपास ५९ हजार ८९९ अर्जाची पुन्हा फेरतपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीनं देण्यात आली आहे.