January 15, 2025 10:11 AM January 15, 2025 10:11 AM

views 15

लडाखमध्ये, कारगिलमधील राष्ट्रीय महामार्ग एकवर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

लडाखमध्ये, कारगिलमधील राष्ट्रीय महामार्ग एकवर कटपाकासी शिलिकचे इथं काल एका स्कॉर्पिओची ट्रिपरशी टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे. जखमींवर कारगिल जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

June 30, 2024 1:44 PM June 30, 2024 1:44 PM

views 5

भारत-चीन सीमेवर लडाखमध्ये युध्दअभ्यासादरम्यान 5 जवानांना वीरमरण

भारत-चीन सीमेवर लडाखमध्ये, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरु असलेल्या T.72 रणगाडा युध्द सरावा दरम्यान अपघात झाल्यानंतरचं बचावकार्य काल रात्री थांबवण्यात आलं . पाच जवानांना या अपघातात वीरमरण आलं. या पाचही वीरांचे मृतदेह हाती लागले असल्याचं सैन्यदलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. दौलत बेग ओडे भागात रणगाडा युद्धाचा सराव सुरू असताना श्योक नदीला अचानक आलेल्या पुरामुळे  ही दुर्घटना घडली अशी माहितीही प्रवक्त्यानं दिली.