April 15, 2025 2:48 PM

views 18

लखनौ इथल्या लोकबंधू रुग्णालयातल्या बाह्यरुग्ण सेवा आता पूर्ववत सुरु

उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या लोकबंधू रुग्णालयातल्या बाह्यरुग्ण सेवा आता पूर्ववत सुरु झाल्या असल्याचं रुग्णालय संचालक संगीता गुप्ता यांनी म्हटलं आहे. रुग्णालयात काल रात्री लागलेल्या मोठ्या आगीनंतर २०० हुन जास्त रुग्णांना बाहेर काढून जवळच्या बलरामपूर रुग्णालय, के जी एम यु रुग्णालयांत तसंच सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.

April 15, 2025 10:26 AM

views 12

लखनौ इथल्या लोकबंधू रुग्णालयाला लागली भीषण आग

उत्तर प्रदेशात लखनौ इथल्या लोकबंधू रुग्णालयात काल रात्री उशिरा आग लागली, यामुळे रुग्णालय प्रशासनाने तत्काळ कारवाई करत 2 शे रुग्णांना तिथून बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाल्याच वृत्त नाही तसच कोणीही जखमी झालेल नाही .उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी काल रात्री रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसच रुग्णालय प्रशासनाने प्रसंगावधान दाखवल्याबद्दल त्यांच कौतुक केल. प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याच निष्पन्न झाल असून , उत्...

July 13, 2024 8:40 PM

views 27

कायद्याचं शिक्षण प्रादेशिक भाषेत मिळायला हवं – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड

सर्वसामान्य लोकांना कायद्याची मुलतत्त्वे जर सोप्या भाषेत समजाऊन देता आली नाहीत तर तो कायदे शिक्षण आणि कायद्याच्या व्यवसायामधला दोष आहे. असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौमधे डॉ. राममनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते. कायद्याचं शिक्षण प्रादेशिक भाषेत मिळायला हवं यावर त्यांनी भर दिला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. लोहिया विद्यापीठात हिंदीत कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमाला सुरुवात होईल अशी आशाही त्यांनी यावे...