December 1, 2024 9:12 AM December 1, 2024 9:12 AM
1
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४७ व्यां तुकडीचं दिमाखदार दीक्षान्त संचलन
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४७ व्यां तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा काल पुण्यात वायुदल प्रमुख एयर चिफ मार्शल अमर प्रीत सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत खेत्रपाल मैदानावर दिमाखात पार पडला. सैन्य दलाच्या कारकीर्दीत कठीण निर्णय घेण्याची वेळ तुमच्यावर येईल त्यावेळी तुम्ही तुमच्या विचारांशी एकनिष्ठ राहा म्हणजे सोप्या मार्गाचा अवलंब न करता आव्हानात्मक मार्गाचा स्वीकार कराल असा कानमंत्र त्यांनी छात्रांना याप्रसंगी दिला. एयर चिफ मार्शल अमरप्रित सिंग यांनी संचलनाचं निरीक्षण केलं. सिंग यांच्या हस्ते राष्...