January 16, 2025 3:50 PM January 16, 2025 3:50 PM

views 14

भंडारा जिल्ह्यातील तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

भंडारा जिल्हा ग्रामीण आरोग्य सेवेच्या येरली, वडद आणि लाखोरी या तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सने या पुरस्कारांसाठी प्रमाणपत्र जाहीर केलं आहे. भारतातल्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये, आरोग्य सुविधा आणि संसर्ग नियंत्रण करणाऱ्या मार्गांची अंमलबजावणी यांच्या गुणवत्तेचं मानांकन आणि मूल्यांकन प्रक्रियेअंतर्गत हे पुरस्कार दिले जातात.

October 18, 2024 7:23 PM October 18, 2024 7:23 PM

views 9

गडचिरोली जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापीठाला फिक्कीचा ‘संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व राष्ट्रीय पुरस्कार

गडचिरोली जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापिठाला फिक्कीच्या संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व या राष्ट्रीय पुरस्कारानं तर महात्मा फुले कृषि विद्यापीठाला फिक्कीच्या सर्वोकृष्ट विद्यापीठ या पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. दिल्लीत आज झालेल्या १९ व्या 'फिक्की हायर एज्युकेशन समिट २०२४' या कार्यक्रमात भारतातल्या ब्रिटिश सरकारच्या उच्चायुक्त लिंडा कॅमरून यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.  ग्रामसभा सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत गोंडवाना विद्यापीठाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. महात्म...