June 20, 2025 2:17 PM June 20, 2025 2:17 PM
12
केंद्रीय गृहमंत्री आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात होणार सहभागी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं आयोजित राष्ट्रीय परिसंवादात सहभागी होणार आहेत. तसंच महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते आज होणार आहे. अमित शहा यांनी काल बेंगळुरूमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. आदिचुंचनागिरी विद्यापीठाच्या बेंगळुरू इथल्या संकुलाचं उद्घाटन आज शहा यांच्या हस्ते झालं.