June 20, 2025 2:40 PM June 20, 2025 2:40 PM
28
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती निकेतनमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज डेहराडूनमध्ये राष्ट्रपती निकेतन आणि राष्ट्रपती तपोवनचं उद्घाटन केलं. तसंच राष्ट्रपती निकेतनमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि राष्ट्रपती उद्यानाची पायाभरणी ही राष्ट्रपती मुर्मू यांनी केली. राष्ट्रपती उद्यान ही बाग १३२ एकरवर विकसित केली जाणार आहे. राष्ट्रपती निकेतन आणि तपोवन येत्या २४ तारखेपासून जनतेसाठी खुले होणार आहेत. या वेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय दृष्टिहीन दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण संस्थेच्या विद्यार्थ्यांनाही संबोधित केलं.