April 1, 2025 1:59 PM April 1, 2025 1:59 PM

views 19

सर्वसामान्य नागरिकांचा रिझर्व बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेव असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

भारतीय रिझर्व्ह बँकेशी सामान्य नागरिकांचा थेट संबंध येत नसला, तरी त्यांच्या सर्व आर्थिक देवाणघेवाणी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येतात, त्यामुळे देशाच्या सर्व नागरिकांचा रिझर्व बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेव आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या स्थापनादिन सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात त्या मुंबईत बोलत होत्या. डिजिटल व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात आरबीआयनं महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असल्याचं त्या म्ह...

February 11, 2025 9:52 AM February 11, 2025 9:52 AM

views 19

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर केलं स्नान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं. नंतर त्यांनी अक्षयवट आणि बडा हनुमान मंदिर इथेही भेट दिली. महाकुंभात आतापर्यंत 43 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलं असून तो येत्या 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.  

November 13, 2024 11:15 AM November 13, 2024 11:15 AM

views 19

सिल्वासा इथल्या झेंडा चौक शाळेचं आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या तीन दिवसांच्या दादरा, नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज राष्ट्रपतींच्या हस्ते आज सिल्वासा इथल्या झेंडा चौक शाळेचं उद्घाटन होणार आहे. झेंडा चौक शाळेचं संकुल अत्याधुनिक असून तिथं सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या आधुनिक सोईसुविधा उपलब्ध आहेत. राष्ट्रपती आज सिल्वासामधल्या नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेला भेट देऊन तिथल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसंच त्या दीव इथल्या आयएनएस खुक्...

November 6, 2024 10:50 AM November 6, 2024 10:50 AM

views 11

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिन्हा यांच्या निधनाबद्दल व्यक्त केलं दुःख

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिन्हा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. बिहार कोकिळा नावानं ओळखल्या जाणाऱ्या सिन्हा यांनी आपल्या लोकगीतांनी देशात आणि परदेशातही आध्यात्मिक वातावरण तयार केलं, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. सिन्हा यांची मैथिली आणि भोजपुरी भाषांमधली लोकगीतं अनेक दशकं लोकप्रिय होती आणि त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची हानी झाली आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर श्रद्धांजली वाहिली आहे.  

October 18, 2024 9:02 PM October 18, 2024 9:02 PM

views 8

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मलावीचे राष्ट्राध्यक्ष लाझारस चकवेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा

अफ्रिकेच्या तीन देशांच्या दौऱ्यादरम्यान, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मलावीचे राष्ट्राध्यक्ष लाझारस चकवेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा घेतल्या. यावेळी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर भारत आणि मलावी यांच्यात चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारतानं मलावीला एक हजार मेट्रिक टन तांदूळ आणि भाभाट्रॉन कर्करोग उपचार मशीन सदिच्छा भेट म्हणून दिलं आहे. राष्ट्रपतीनीं मलावीमध्ये कायमस्वरूपी कृत्रिम अवयव प्रत्यारोपण केंद्र निर्माण करण्याची घोषणा केली.     दरम्यान उद्या राष्ट्रपतीं...

October 15, 2024 2:06 PM October 15, 2024 2:06 PM

views 11

भारत आणि अल्जेरियामध्ये अधिकाधिक आर्थिक भागिदारी वाढवण्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिला भर

भारत आणि अल्जेरियामध्ये अधिकाधिक आर्थिक भागिदारी वाढवण्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर दिला आहे. द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं आणि सहकार्यासाठी नवनवीन मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी केलं. अल्जेरियाची राजधानी अल्जियर्समध्ये काल त्या अल्जेरिया-भारत आर्थिक फोरमला संबोधित करत होत्या.

October 9, 2024 2:12 PM October 9, 2024 2:12 PM

views 15

आयुर्वेद औषध निर्मिती उद्योगात तरुणांचा सहभाग गरजेचा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशभरात पारंपरिक औषधांची उपलब्धता वाढवण्यासाठी आयुर्वेद औषध निर्मिती उद्योगात तरुणांनी सहभाग घेणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या ८व्या वर्धापन दिनानिमित्त त्या नवी दिल्ली इथं बोलत होत्या. आयुर्वैदिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. देशात चांगल्या आयुर्वैदिक डॉक्टरांची गरज असल्याचंही राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या.

September 30, 2024 8:15 PM September 30, 2024 8:15 PM

views 11

भारतीय पोलीस सेवा ७६ RR प्रोबेशनर्सनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट

भारतीय पोलीस दलातल्या वर्ष २०२३ च्या तुकडीच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.  कायदा आणि सुव्यवस्था हा केवळ शासन व्यवस्थेचा पाया नसून तो आधुनिक राज्याचा आधार आहे,  असं राष्ट्रपती मुर्मू प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना  संबोधित करताना म्हणाल्या. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असेल तरच  आर्थिक आणि  सामाजिक विकास शक्य आहे,   नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण केल्यानेच  प्रगतीला अर्थ प्राप्त होतो , असंही राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या.

September 30, 2024 8:07 PM September 30, 2024 8:07 PM

views 17

योजनांमुळे महिलांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यात लक्षणीय वाढ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशात आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी केंद्रसरकार सातत्यानं प्रयत्न करत असून, आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीमुळे महिलांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यात लक्षणीय वाढ झाली आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत  अटलबिहार वाजपेयी आयुर्विज्ञान संस्था आणि डॉ राममनोहर लोहिया रुग्णालयाच्या दहाव्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. भक्कम आरोग्य सेवा सुविधा उभारण्यासाठी केंद्रसरकारनं गेल्या १० वर्षात केलेली कामं त्यांनी अधोरेखित केली. वैद्यकीय मह...

September 24, 2024 7:40 PM September 24, 2024 7:40 PM

views 14

एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स च्या १६व्या परिषदेचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स च्या १६व्या परिषदेचं उद्घाटन केलं. भारताच्या सीएजी यांची देशाच्या सार्वजनिक वित्तव्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. भारतीय संविधानानं कॅग कार्यालयाला व्यापक अधिकार आणि संपूर्ण स्वायत्तता प्रदान केली असल्याचं त्यांंनी सांगितलं. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी लेखापरीक्षण संस्थांच्या भूमि...