February 6, 2025 1:40 PM

views 14

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावरील चर्चेला प्रधानमंत्री आज राज्यसभेत उत्तर देणार

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्ताव चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देतील. आज संध्याकाळी मोदी सभागृहाला संबोधित करतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. दोन दिवसांपूर्वीच लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा आभारप्रस्ताव मंजूर झाला होता.

February 4, 2025 1:51 PM

views 18

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावरील चर्चेला आज प्रधानमंत्री लोकसभेत उत्तर देणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावर चर्चेला उत्तर देतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. संध्याकाळी पाच वाजता मोदी चर्चेला उत्तर देणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरल्या चर्चेला काल संसदेच्या दोन्ही सभागृहात सुरूवात झाली.