August 19, 2024 6:17 PM August 19, 2024 6:17 PM

views 15

मांडवा ते मुंबई दरम्यान समुद्रातून प्रवासी फेरीबोट १ सप्टेंबरपासून सुरू होणार

रायगडमधील मांडवा ते मुंबई दरम्यान समुद्रातून प्रवासी फेरीबोट १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पावसाळ्यामुळे ही सेवा २६ मे पासून बंद ठेवण्यात आली होती. हवामान आणि समुद्राच्या लाटांचा अंदाज घेऊन मेरीटाईम बोर्डाने ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

July 23, 2024 8:43 AM July 23, 2024 8:43 AM

views 16

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे, तर काही ठिकाणी नदीनाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे आणि १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. काल सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. विदर्भात अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना काल सुट्टी जाहीर करण्यात...

July 11, 2024 9:13 AM July 11, 2024 9:13 AM

views 22

13 जुलै दरम्यान मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार

रायगड जिल्ह्यातल्या कोलाडजवळच्या पुई इथल्या नवीन पुलाचा गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं आजपासून 13 जुलै दरम्यान सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या वेळात मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान वरंध घाटदेखील 31 ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची अधिसूचना रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढली आहे. 19 जूनला झालेल्या जोरदार पावसानं दरड कोसळून रस्ता खचून वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद आणि धोकादा...