April 5, 2025 3:34 PM April 5, 2025 3:34 PM

views 12

रामनवमी निमित्त राज्यात अनेक ठिकाणी रामजन्मोत्सव साजरा होणार असून त्या दृष्टीनं मंदिरांमध्ये तयारी सुरु

रामनवमी निमित्त राज्यात अनेक ठिकाणी रामजन्मोत्सव साजरा होणार असून त्या दृष्टीनं मंदिरांमधे तयारी सुरु आहे. शिर्डीमध्ये साईबाबा समाधी मंदिरात आज पासून रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला असून तो ७ एप्रिल पर्यंत चालणार आहे. या उत्सवानिमित्त मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गोंदिया शहरात रामनवमीनिमित्त आज बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीराम मंदिरापासून सुरु झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने युवकांनी भाग घेतला. अनेक ठिकाणी नागरीकांनी आपल्या घरासमोरून ...

April 5, 2025 2:42 PM April 5, 2025 2:42 PM

views 2

रामनवमी निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला देणार भेट

रामनवमी निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला भेट देणार असून रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या नवीन पांबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार आहेत. आकाशवाणीवरून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असल्यानं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र उद्या दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होईल.