July 24, 2024 3:01 PM July 24, 2024 3:01 PM

views 11

महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे

महसूल खात्याच्या विविध विभागातल्या कर्मचाऱ्यांचा संप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर काल मागे घेण्यात आला. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी कामगारांना संप थांबवण्याचं आवाहन करून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीद्वारे तोडगा काढावा, असे निर्देश दिले. महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून इतर मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असून लवकरच शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर या मागण्या मान्य केल्या जातील असं आश्वासन विखे पाटील यांनी दिलं. त्यानंतर सं...

July 9, 2024 3:31 PM July 9, 2024 3:31 PM

views 15

नवीन महसूल कार्यालय निर्मिती आणि महसूल विभागातल्या अन्य विषयांबाबत शिफारशी करण्यासाठी समिती स्थापन

राज्यात नवीन महसूल कार्यालय निर्मिती आणि महसूल विभागातल्या अन्य विषयांबाबत शिफारशी करण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल येत्या २५ तारखेला प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. त्याचप्रमाणे पुनर्रचना करून नवीन तालुका निर्मितीचे निकष ठरवण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्याचंही महसूल मंत्र्यांनी सांगितलं...

June 14, 2024 7:51 PM June 14, 2024 7:51 PM

views 15

राज्यातल्या सुमारे साडे बाराशे महसुली मंडळात चारा डेपो उभारायला राज्य सरकारची परवानगी

राज्यातल्या अनेक भागात पावसाचं आगमन झालं असलं तरी अनेक विभागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही म्हणून १ हजार २४५ महसुली मंडळात चारा डेपो उभारायला शासनानं परवानगी दिली आहे. राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जनावरांचं पालन करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या राज्यात सुमारे ५१२ लाख मेट्रिक टन हिरवा चारा तर सुमारे १४४ लाख मेट्रिक ...