February 11, 2025 3:18 PM February 11, 2025 3:18 PM

views 79

राज्यात दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजनेत एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार

येत्या आर्थिक वर्षापासून दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी राखीव ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासंदर्भातला शासन आदेश काल जारी झाला. या निधीच्या योग्य विनियोग होण्यासाठी सुस्पष्ट आदेश लवकरच नियोजन विभाग, वित्त विभागाच्या मान्यतेने दिव्यांग कल्याण विभाग निर्गमित करेल, असंही त्यांनी सांगितलं.

February 11, 2025 9:41 AM February 11, 2025 9:41 AM

views 24

राज्यात हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला सुरुवात

जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला कालपासून सुरुवात झाली. राज्यात पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतल्या विविध तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दूरस्थ माध्यमातून या मोहिमेचं उद्घाटन केलं. या मोहिमेअंतर्गत दोन वर्षांपेक्षा लहान बालकं, गरोदर माता आणि गंभीर आजारी व्यक्ती वगळता सर्वांना प्रतिबंधक गोळ्यांचा डोस देण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्या...

February 5, 2025 11:11 AM February 5, 2025 11:11 AM

views 12

राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहणार असून उद्यापर्यंत हवामान कोरडं राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.  

February 4, 2025 10:13 AM February 4, 2025 10:13 AM

views 11

राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ

राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली आहे. येत्या 24 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  

January 22, 2025 10:10 AM January 22, 2025 10:10 AM

views 10

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाचे सर्वाधिक 20 रुग्ण अकोला महापालिकेत आढळले आहेत. हिवतापाचे सर्वाधिक 185 रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदविण्यात आले असून, त्या खालोखाल गडचिरोलीत 138 रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक 44 रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदविण्यात आले आहेत. असं आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आलं आहे.

November 6, 2024 8:36 AM November 6, 2024 8:36 AM

views 20

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी काल प्रचाराचा नारळ फोडला. तर वंचित बहुजन आघाडीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. महायुतीतर्फे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये एकत्रित जाहीर सभा घेत प्रचाराचं रणशिंग फुंकलं. राज्यात महिला, शेतकरी, युवा यांच्यासह विविध घटकांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा ...

October 10, 2024 2:14 PM October 10, 2024 2:14 PM

views 18

राज्यातल्या १९ जाती तसंच समुदायांचा, ओबीसींच्या केंद्रीय यादीत समावेश करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची शिफारस

राज्यातल्या १९ जाती तसंच समुदायांचा ओबीसींच्या केंद्रीय यादीत समावेश करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं शिफारस केली आहे. यामध्ये लोढ, लोढा, लोधी, बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, डांगरी, भोयर, पवार, कापेवार, मुन्नार कापेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुकेकरी या जाती, तसंच समुदायांचा समावेश आहे.

September 26, 2024 7:27 PM September 26, 2024 7:27 PM

views 22

राज्यातल्या अनेक धरणांच्या पातपातळीत वाढ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यावर पोहोचला असून धरणाच्या १८ दरवाजांमधून सध्या ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर तर बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. लातूर जिल्ह्यातल्या तेरणा, मांजरा आणि रेणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यापैकी रेणापूर मध्यम प्रकल्पातून रेणा नदीपात्रात विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदेडमध्ये विष्णुपुरी प...