April 9, 2025 10:04 AM April 9, 2025 10:04 AM

views 12

अंबाजोगाई इथलं प्राचीन सकलेश्वर अर्थात बाराखांबी मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित

महाराष्ट्र शासनानं अंबाजोगाई इथलं ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर अर्थात बाराखांबी मंदिर, हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. या निर्णयामुळे या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणासह पर्यटनालाही चालना मिळणार आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता.