July 9, 2024 7:04 PM July 9, 2024 7:04 PM

views 6

उपराष्ट्रपती जगदीप धनखड येत्या ११ तारखेला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष जगदीप धनखड येत्या ११ तारखेला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचं यासंदर्भातलं निमंत्रण उपराष्ट्रपतींनी स्वीकारलं आहे. देशाची  लोकशाही मूल्यं आणि नीतिमत्ता वाढवण्याबाबत ते सदस्यांना मार्गदर्शन करतील.

June 27, 2024 6:39 PM June 27, 2024 6:39 PM

views 17

राज्य विधिमंडळाचं हे अधिवेशन आमच्यासाठी निर्धार आणि निश्चयाचं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य विधिमंडळाचं हे अधिवेशन आमच्यासाठी निर्धार आणि निश्चयाचं आहे. गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलं आहे. मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते. निरोप कोण कुणाला देतो, हे येणारा काळच ठरवेल, असंही ते म्हणाले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान आमच्या सरकारनं दिलं. शेताच्या बांधावर जाणारं हे सरकार आहे. शेतकऱ्यांची दुःखं आम्हाला समजतात, असंही शिंदे यांनी नमूद केलं. ड्रग्ज प्रकरण...

June 14, 2024 7:53 PM June 14, 2024 7:53 PM

views 23

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै दरम्यान

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै या कालावधीत मुंबईत होणार आहे. या अधिवेशनात २८ जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनाचं कामकाज १३ दिवस चालणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतले विरोधी पक्षनेते वि...