April 9, 2025 10:42 AM April 9, 2025 10:42 AM

views 12

छत्रपती संभाजीनगरसह महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतल्या शासकीय जमिनींचं प्राधिकरणाकडे हस्तांतरण

छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतल्या शासकीय जमिनी, संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या निर्णयामुळे विकास कामांना वेग येण्याची अपेक्षा आहे. खाजगी अनुदानित आयुर्वेद आणि खाजगी अनुदानित युनानी संस्थांमधल्या, गट-ब, क आणि ड संवर्गातल्या शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना, पूर्वलक्षी प्रभावानं, 'सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना...

February 5, 2025 11:03 AM February 5, 2025 11:03 AM

views 17

टेमघर प्रकल्पाच्या मजबुतीकरणाच्या कामांसाठी 315 कोटी रूपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता

पुणे जिल्ह्यातल्या टेमघर प्रकल्पाची गळती रोखण्यासाठी आणि त्याचं मजबुतीकरण करण्याच्या कामांसाठी 315 कोटी 5 लाख रूपयांच्या खर्चाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. टेमघर धरणाला प्रकल्पाला गळती लागल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. धरणाची गळती रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना केल्यानंतर शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. शासकीय भोगवटादार वर्ग-2...

February 5, 2025 10:36 AM February 5, 2025 10:36 AM

views 11

धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे तत्कालिन कृषीमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली. ते म्हणाले... ‘‘शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन हे अधिवेशन धनंजय मु...