February 11, 2025 9:17 AM

views 34

सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची मागणी

जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. राज्यसभेत त्या काल शून्य प्रहरात बोलत होत्या. सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली.

February 6, 2025 1:40 PM

views 21

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावरील चर्चेला प्रधानमंत्री आज राज्यसभेत उत्तर देणार

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्ताव चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देतील. आज संध्याकाळी मोदी सभागृहाला संबोधित करतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. दोन दिवसांपूर्वीच लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा आभारप्रस्ताव मंजूर झाला होता.

August 27, 2024 9:02 AM

views 34

राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील आणि भाजपाचे धैर्यशील पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

राज्यसभेच्या राज्यातील दोन रिक्त जागांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नितिन पाटील आणि भाजपाचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती विधीमंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि खासदार उदयनराजे भोसले लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.

July 29, 2024 4:58 PM

views 36

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा पुढे सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. देशात नोकऱ्यांची कमतरता नसून सरकारच्या विविध धोरणात्मक पावलांमुळे देशातला बेरोजगारीचा दर ३ पूर्णांक २ दशांश टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं प्रतिपादन कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत केलं. प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते. येत्या...

July 29, 2024 7:05 PM

views 30

दिल्लीतल्या प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

दिल्लीतल्या प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राज्यसभेत आज अल्पकालीन चर्चा झाली. भाजपाचे डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी चर्चेला सुरुवात केली. अक्षम्य निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र, रेल्वे अपघात, मणिपूरमधला हिंसाचार, नीट परीक्षा इत्यादी विषयांवर चर्चा करण्याची परवानगी सभागृहाने का दिली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्रीय...

July 4, 2024 2:43 PM

views 24

राज्यसभेचं कामकाज संस्थगित

मणिपूरमधली परिस्थिती निवळण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्द्ल आभार प्रस्तावाला राज्यसभेत उत्तर देताना “मणिपूरमध्ये शांतता आणि सौहार्द सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्व संबंधितांशी चर्चा करत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. मणिपूरमध्ये राहून स्वतः गृहमंत्र्यांनी शांततेसाठीच्या वाटाघाटी घडवून आणल्या. मणिपूरमधे हिंसाचाराच्या घटना सातत्याने कमी होत असल्याचं सत्य आपण मान्य केलं ...

June 20, 2024 1:19 PM

views 37

सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी केली आहे. राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.