April 15, 2025 3:53 PM April 15, 2025 3:53 PM

views 3

दिव्यांग युवांच्या कौशल्य विकास आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी राज्यशासनाने केले तीन सामंजस्य करार

दिव्यांग युवांच्या कौशल्य विकास आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी आज तीन सामंजस्य करार झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. या करारा अंतर्गत प्रोजेक्ट मुंबई ही स्वयंसेवी संस्था दिव्यांग युवांना तांत्रिक प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी तीन वर्षांचा असेल.

February 6, 2025 3:58 PM February 6, 2025 3:58 PM

views 3

नापास विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत ढकलण्याच्या राज्यशासनाच्या योजनेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विरोध

नापास विद्यार्थ्याना पुढच्या इयत्तेत ढकलण्याच्या राज्यशासनाच्या योजनेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विरोध केला असून, यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेला गंभीर धोका निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. विद्यार्थी परिषदेनं जारी केलेल्या निवेदनातून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात टीका नोंदवली आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता सुधारण्यासाठी सरकारनं शैक्षणिक निकष कमी करण्याऐवजी शैक्षणिक सुधारणांवर भर द्यावा असं यात म्हटलं आहे. दरम्यान, राज्यातल्या सर्व अकृषी विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्...