April 9, 2025 3:26 PM April 9, 2025 3:26 PM

views 7

शांती, सौहार्दाशिवाय विकसित राष्ट्राचे ध्येय गाठता येणार नाही: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

समाजात शांती आणि सौहार्दपूर्ण वातावरण असल्याशिवाय विकसित राष्ट्र बनण्याचं ध्येय गाठता येणार नाही, असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. उद्या साजऱ्या होणाऱ्या महावीर जयंतीच्या निमित्तानं आज मुंबईत आयोजित 'सर्व धर्मीय संवादाच्या माध्यमातून जागतिक शांतता आणि सौहार्द' या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. सर्वधर्म संवादामुळे परस्परांविषयीचे पूर्वग्रह दूर व्हायला आणि समाजतील दुही मिटवायला मदत होईल, असंही ते म्हणाले. या कार्यक्रमाला बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे देखील उपस्थित हो...

February 6, 2025 11:09 AM February 6, 2025 11:09 AM

views 9

शाश्वत ग्रामविकासासाठी कृषी विद्यापीठांनी मध्यवर्ती भूमिका बजावण्याचं राज्यपालांचं आवाहन

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते काल अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 39 व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. शाश्वत ग्रामविकासासाठी कृषी विद्यापीठांनी मध्यवर्ती भूमिका बजावावी, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मातीचा पोत सुधारणं, चांगलं बी-बियाणं, वाण शोधाणं, पाण...

October 9, 2024 10:14 AM October 9, 2024 10:14 AM

views 9

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा आज बीड तसंच जालना दौरा

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे आज बीड तसंच जालना दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथून सकाळी दहा वाजेच्या सुमारास ते हेलिकॉप्टरने बीडकडे प्रयाण करतील. दुपारी दोन वाजेपर्यंत विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधून सव्वा दोन वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरने ते जालन्याकडे प्रयाण करणार आहेत.  

September 30, 2024 8:13 AM September 30, 2024 8:13 AM

views 6

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते

शेतकऱ्यांच्या यशोगाथेतूनच समाज, राज्य आणि देश उभा राहतो, त्यांच्याशिवाय देशाला भविष्य नाही, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. वर्ष २०२० ते २०२२साठीच्या एकंदर ४४८ राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यातल्या शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा होता, त्यामुळेच ते इतकं महान कार्य करू शकले, असं राज्यपालांनी नमूद केलं.  या पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ केली असून, या पुरस्कारांमुळे बळीराजाला स्फूर्ती...

September 23, 2024 7:01 PM September 23, 2024 7:01 PM

views 10

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करण्याचं राज्यपालांचं आवाहन

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ मुंबई विद्यापीठात झाला. त्यावेळी ते बोलत होते.     राज्यपालांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि  व्यवस्थापन, मानवता विद्या शाखा, आंतरविद्या शाखा अशा विविध शाखांमधून १ हजार १३० पदवीधरांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदा...

August 26, 2024 7:27 PM August 26, 2024 7:27 PM

views 10

आदिवासी बांधवांचा सर्वांगीण आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत – राज्यपाल

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी  केलं आहे. आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर आदर्श आदिवासी गाव बनवणं आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणं, या विषयाबाबत आज मुंबईत राजभवनात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. ‘प्रधानमंत्री जनमन योजने’च्या राज्यातल्या अंमलबजावणीचा आढावाही त्यांनी घेतला. आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्या...

August 14, 2024 7:16 PM August 14, 2024 7:16 PM

views 11

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला दिल्या शुभेच्छा

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्र राज्यानं सामाजिक तसंच आर्थिक विकासात उल्लेखनीय प्रगती केली आहे. महाराष्ट्र राज्य हे भारतातलं केवळ आघाडीचंच राज्य नसून ते प्रगती आणि नवनिर्मितीचं प्रतीकही आहे, असं राज्यपालांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. समृद्ध आणि सर्वसमावेशक विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात महाराष्ट्र निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला आहे.