June 18, 2025 9:05 AM June 18, 2025 9:05 AM

views 21

राज्यात आतापर्यंत सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या

राज्यातल्या विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून, आतापर्यंत सुमारे ११ पूर्णांक ७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ सरासरी आठ टक्के इतकं आहे. पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करुन ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

April 17, 2025 3:26 PM April 17, 2025 3:26 PM

views 15

राज्यात राबवण्यात येतोय जल व्यवस्थापन कृती पंधरवडा

राज्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवडा राबवण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असून, याअंतर्गत येत्या २२ तारखेला उपसा सिंचनाच्या पाणी परवाना तक्रारींचं निवारण केलं जाणार आहे. लाभक्षेत्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नांदेड इथं जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यात काल गुणनियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्ह्यातल्या जलव्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत विविध मान्यवर तसंच शेतकरी, पाणी वा...

April 17, 2025 10:51 AM April 17, 2025 10:51 AM

views 19

राज्यातल्या अनेक शहरांत कमाल तापमान चाळीशीपार

राज्यात बहुतांश ठिकाणी उन्हाच्या झळांमध्ये वाढ झाली असून अनेक ठिकाणी कमाल तापमानानं चाळीशी ओलांडली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोल्यात ४३ पूर्णांक ७ दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मालेगांव, अहिल्यानगर, जळगांव तसंच मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठि...

April 17, 2025 10:32 AM April 17, 2025 10:32 AM

views 21

राज्यातल्या तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन

राज्यातल्या तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचं निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या गठित करण्याचा निर्णय, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. या समित्या फडमालक आणि कलावंतांच्या समस्या समजून घेऊन, उपाययोजना सुचवतील, अशी माहिती त्यांनी दिली.

April 17, 2025 10:28 AM April 17, 2025 10:28 AM

views 12

या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी सीबीएसई आधारित अभ्यासक्रम लागू करण्याचा शासन आदेश जारी

राज्यात सीबीएसईच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा शासन आदेश काल जारी झाला. या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी, पुढच्या शैक्षणिक वर्षापासून दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी, २०२७-२८ पासून पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीसाठी, तर २०२८-२९ ला आठवी, दहावी आणि बारावीसाठी CBSE अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आधीच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या स्तराऐवजी नव्या शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर अशी रचना करण्यात आली आहे. या धोर...

April 15, 2025 3:25 PM April 15, 2025 3:25 PM

views 35

राज्यातल्या नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी क्षेत्रात मालमत्ता करावरचा दंड अंशतः माफ करून कर वसुलीसाठी अभय योजना राबवण्यात येणार

राज्यातल्या नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी क्षेत्रात मालमत्ता करावरचा दंड अंशतः माफ करून कर वसुलीसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. त्याकरता नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये आवश्यक सुधारणा करायला आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. ठाणे जिल्ह्यात चिखलोली – अंबरनाथ इथं दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्याच्या दृष्टीने आवश्यक पदांना आज राज्यमंत्रिमंडळाने मंजुरी दिली. कोठडीत कैद...

April 9, 2025 10:23 AM April 9, 2025 10:23 AM

views 51

राज्यात येत्या २-४ दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

राज्याच्या बहुतांश भागात सध्या तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. अकोला इथं काल राज्यातील सर्वात जास्त 44 पूर्णांक 2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यात येत्या 2-4 दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.  

April 1, 2025 3:26 PM April 1, 2025 3:26 PM

views 16

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

राज्यातल्या बहुतेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामानखात्याने दिला आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.येत्या दोन दिवसांसाठी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच अकोला, अमरावती , बुलढाणा, कोल्हापूर, सांगली , बीड, लातूर, भंडारा, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमधे अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

April 1, 2025 9:41 AM April 1, 2025 9:41 AM

views 18

राज्याच्या काही भागात पुढील चार दिवस पावसाचा इशारा – हवामान विभाग

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

February 11, 2025 3:35 PM February 11, 2025 3:35 PM

views 17

सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचं राज्याच्या पणन विभागाकडून स्पष्ट

सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचं राज्याच्या पणन विभागानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी आधी १३ जानेवारीपर्यंत मुदत होती; ती संपल्यानंतर केंद्र शासनाने २४ दिवसांची म्हणजे दिनांक ६ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्याचं वृत्त काही माध्यमांमधून देण्यात आलं होतं; त्यावर ६ फेब्रुवारीनंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही असं पणन विभागानं स्पष्ट केलं आहे.