January 16, 2025 3:37 PM
8
गोदावरी स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनी मोठा लढा उभारावा – राजेंद्र सिंह
जलप्रदूषण आणि काँक्रिटीकरणामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीचं आरोग्य बिघडलं असून, गोदावरी स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनी मोठा लढा उभारावा, असं आवाहन, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केलं आहे. नाशिक मध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित, गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचे भवितव्य गोदावरी आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे भविष्यातील स्वरूप; या विषयावरील पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या जलसंवाद कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशभरातल्या नागरिकांचं श्रद्धास्थान असलेला गोदा घाट म्हणजेच रामकुंड हा त...