February 3, 2025 2:20 PM

views 24

इंग्लंडचे राजे चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी राजभवनात राज्यपालांची घेतली भेट

इंग्लंडचे राजे चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स एडवर्ड हे सध्या मुंबई भेटीवर असून त्यांनी काल राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत आणि ब्रिटनमधले संबंध मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं तसंच दोन्ही देशांमधे सहकार्याची भावना वाढीला लागावी, अशी इच्छाही व्यक्त केली. भारतात क्रिकेट या खेळाची लोकप्रियता नमूद करून बॅडमिंटनमधे भारताच्या प्रगतीचंही त्यांनी कौतुक केलं.

August 26, 2024 7:27 PM

views 21

आदिवासी बांधवांचा सर्वांगीण आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत – राज्यपाल

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी  केलं आहे. आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर आदर्श आदिवासी गाव बनवणं आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणं, या विषयाबाबत आज मुंबईत राजभवनात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. ‘प्रधानमंत्री जनमन योजने’च्या राज्यातल्या अंमलबजावणीचा आढावाही त्यांनी घेतला. आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्या...