July 13, 2024 3:27 PM

views 23

रब्बी हंगमात शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धान्याचे 65 कोटी रुपये शेतकऱ्यांना सोमवार पासून होणार वितरीत

गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात केलेल्या खरेदीची रक्कम अदा करण्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा विपणन महासंघाच्या खात्यात रक्कम वर्ग केला गेला आहे. यानंतर आता येत्या सोमवार पासून धान्याच्या खरेदीचा परतावा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरीत केला जाणार आहे. गेल्या रब्बी हंगामात गोंदिया जिल्हा विपणन महासंघानं जिल्ह्यातल्या ११ हजार ६०५ शेतकऱ्यांकडून ५ लाख १२ हजार क्विंटल इतक्या धान्याची खरेदी केली होती.

July 6, 2024 7:13 PM

views 17

देशांतर्गत बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याची केंद्र सरकारची ग्वाही

रब्बी हंगामातल्या कांद्याची बाजारातली आवक वाढत असल्यामुळे कांद्याचे दर स्थिर होत असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांंद्याचं उत्पादन कमी होऊनही देशातल्या बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता आहे. त्याचबरोबर यंदाच्या रब्बी हंगामात कांद्याचं अंदाजित उत्पादन १९१ लाख टन असून देशातल्या ग्राहकांची गरज भागवण्यासाठी ते पुरेसं आहे, अशी माहितीही या मंत्रालयानं दिली आहे. यंदा तीन लाख ६१ हजार हेक्टर परिसरात खरिपातल्या कांद्याची लागवड ...