July 13, 2024 12:13 PM July 13, 2024 12:13 PM

views 15

छत्रपती संभाजीनगर इथले हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचं निधन

छत्रपती संभाजीनगर इथल्या हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचं काल कॅनडात निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. तजकरे उजालों के, मुल्के खुदा तंगनिस्त, ही त्यांची उर्दू पुस्तकं प्रकाशित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवृत्त पर्यटन विभागप्रमुख डॉ. दुलारी कुरेशी यांचे ते पती होत. डॉ. दुलारी यांच्यासह त्यांनी औरंगाबादनामा या मराठी आणि द ग्लोरियस औरंगाबाद या इंग्रजी पुस्तकांचं सहलेखन केलं. ऐतिहासिक वास्तुंचा संरक्षित वास्तूंच्या यादीत समावेश करवून घेण्या...