June 17, 2024 2:51 PM

views 51

आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी प्रधानमंत्री मोदींनी भद्रासनाचा व्हिडिओ केला शेअर

येत्या २१ जूनला असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं औचित्य साधत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर भद्रासन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. भद्रासनामुळे सांधे दुखी कमी होऊन ते मजबूत होतात. रोज भद्रासन केल्यामुळे गुडघेदुखीचा त्रासही कमी होतो, असं  प्रधानमंत्र्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे.