June 21, 2024 8:38 PM June 21, 2024 8:38 PM

views 7

याेगाची उपयुक्तता जगभरातल्या लोकांना समजल्यामुळे योगाभ्यासाची व्याप्ती वाढली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या १० वर्षात योगाभ्यासाची व्याप्ती वाढली असून योग पर्यटनाविषयीचं आकर्षण वाढल्यामुळे लोक भारतात त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी येतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य समारंभ आज जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं शेर ए काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात झाला. त्यावेळी ते बोलत होते.  शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक वाढीसाठी योगाच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. याेगाची उपयुक्तता जगभरातल्या लोकांना समजल्यामुळे योगाभ्यास करणाऱ्यांची संख्य...