June 13, 2025 10:32 AM June 13, 2025 10:32 AM

views 11

रशिया आणि युक्रेनदरम्यान युध्दबंदींची सुटका करण्याचा दुसरा टप्पा पुर्ण

रशिया आणि युक्रेनदरम्यान युध्दबंदींची सुटका करण्याचा दुसरा टप्पा काल पुर्ण झाला. यामध्ये आजारी असलेले बंदी, युध्दामुळे गंभीर जखमी झालेल्या सैन्यदलातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलांच्या, राष्ट्रीय गार्डच्या आणि सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना मुक्त करण्यात आलं असल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी दिली. तर रशियाच्या एका समूहाचे सैनिक युक्रेनच्या कैदेतून परत आले आहेत आणि ते बेलारूसमध्ये वैद्यकीय देखरेखीखाली असल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे...

September 30, 2024 6:51 PM September 30, 2024 6:51 PM

views 18

रशियाचा यूक्रेनची राजधानी कीववर ड्रोन हल्ला

रशियाने आज पहाटे यूक्रेनची राजधानी कीव इथे ड्रोन हल्ला केला. रशियाने डागलेल्या ७३ पैकी ६७ ड्रोन आणि तीन क्षेपणास्त्रांपैकी एक पाडलं. या दरम्यान, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती यूक्रेन सैन्याने दिली आहे.

September 26, 2024 2:05 PM September 26, 2024 2:05 PM

views 16

युक्रेनला अण्वस्त्र पुरवणारा देश युद्धात सहभागी असल्याचं मानलं जाईल, असा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा इशारा

रशिया विरुद्धच्या युद्धात यूक्रेनला अण्वस्त्र पुरवल्यास संबंधित देशही त्या युद्धात सहभागी असल्याचं मानलं जाईल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. मॉस्को इथं काल झालेल्या रशियाच्या सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. यूक्रेनने या युद्धात लांब पल्ल्याच्या पाश्चात्त्य क्षेपणास्त्रांचा वापर करण्यासाठी अमेरिका आणि युरोपमधल्या आपल्या मित्र राष्ट्रांकडून परवानगी मागितली आहे, असं यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

August 24, 2024 10:26 AM August 24, 2024 10:26 AM

views 15

युक्रेन-रशिया दरम्यानच्या संघर्षावर उभय देशांनी मार्ग काढण्याचं भारताचं आवाहन

युक्रेन आणि रशिया या देशांनी सद्यस्थितीत सुरू असलेल्या संघर्षावर मार्ग शोधला पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभय देशांना केलं. युक्रेनच्या दौऱ्यात, शांतता प्रस्थापित करण्याच्या सर्व प्रयत्नांमध्ये भारत सक्रीय भूमिका निभावेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.   युक्रेनचे राष्ट्राअध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत भेटीदरम्यान मोदी यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. मोदी म्हणाले की, लोककेंद्रीत दृष्टीकोन ठेवून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांची सक्रीय योजना भारतानं आखली आ...

July 9, 2024 10:56 AM July 9, 2024 10:56 AM

views 12

युक्रेन आणि पोलंड यांच्यात द्विपक्षीय सुरक्षा करार

युक्रेन आणि पोलंड यांच्यात द्विपक्षीय सुरक्षा करार झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी वॉर्सामध्ये काल करारावर सह्या केल्या.   वॉशिंग्टनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजे नाटोच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वाचा मानला जात आहे. या कराराअंतर्गत पोलंड हवाई संरक्षण क्षेत्रात युक्रेनला सहकार्य करणार आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पुनर्बांधणीमध्येही पोलंड मदत करणार आहे.

June 26, 2024 8:19 PM June 26, 2024 8:19 PM

views 22

युक्रेनला अमेरिकेचं आर्थिक पाठबळ राहील तोपर्यंत रशिया- युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता नसल्याची रशियाच्या राजदूताची स्पष्टोक्ती

अमेरिका जोपर्यंत युक्रेनला युद्धासाठी आर्थिक पाठबळ देत राहील तोपर्यंत रशिया- युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता नाही, असं आज रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे विशेष राजदूत रॉडिऑन मिरोशनिक यांनी सांगितलं. ते मुंबईत रशियन हाऊस इथं तज्ञांशी आणि प्रसारमाध्यमांशी बोलत होते. युक्रेनला मदत करणं अमेरिकेनं थांबवलं तरच युद्धबंदी होऊन शांतता नांदेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

June 22, 2024 5:59 PM June 22, 2024 5:59 PM

views 29

रशियाचा युक्रेनमधे पॉवर ग्रीडवर जोरदार हल्ला

युक्रेनमधे लीव शहरातल्या वीज निर्मिती आणि पारेषणाच्या पॉवर ग्रीडवर रशियाने केलेल्या जबरदस्त हल्ल्यात दोन वीज कामगार जखमी झाले. युक्रेनच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं, की रशियाने  डागलेल्या१६ क्षेपणास्त्रांपैकी १२ आणि १३ ड्रोन युक्रेनच्या हवाई दलानं निकामी केली. युक्रेनमधल्या पायाभूत सुविधांवर रशियाने गेल्या ३ महिन्यात केलेला हा आठवा हल्ला होता.