July 31, 2024 3:18 PM July 31, 2024 3:18 PM
18
यशश्री शिंदे हत्या प्रकरणातला आरोपी दाऊद शेखला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
नवी मुंबईत उरण इथं यशश्री शिंदे हत्या प्रकरणातला आरोपी दाऊद शेख याला पनवेलच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. आरोपीची पीडितेशी शाळेत असल्यापासून ओळख होती, याआधी २०१९ मध्ये पीडितेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाच्या जलद सुनावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत.