January 7, 2025 2:31 PM January 7, 2025 2:31 PM

views 14

आसाममध्ये कोळशाच्या खाणीत अडकलेल्या खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू

आसाममधे दिमा हसाओ जिल्ह्यात उमरंगसो इथं कोळशाच्या खाणीत अडकलेल्या ९ खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी लष्करानं राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलबरोबर संयुक्त मोहीम सुरू केली आहे. आसाम सरकारनं नौदलाचे पाणबुडे मागितले आहेत. बचावकार्याची पाहणी करण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यानं तातडीनं घटनास्थळी पोहोचवं, असे निर्देश आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिले आहेत. गुवाहाटीपासून २५० किमी अंतरावर मेघालय सीमेजवळ ही बेकायदेशीर कोळसा खाण आहे. ३०० फूट खोल असलेलया या...

December 5, 2024 10:03 AM December 5, 2024 10:03 AM

views 21

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त राज्यात एक ते 19 वर्षे वयोगटातील मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम सुरु

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त राज्यात एक ते 19 वर्षे वयोगटातील मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून, दहा डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील 10 तालुक्यांमधील 1 लाख 72 हजार मुलांना काल ठिकठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीनं जंतनाशक गोळी देण्यात आली. या मोहिमेपासून वंचित राहिलेल्या बालकांना 10 डिसेंबरला ही गोळी देण्यात येणार असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांनी सांगितलं.