February 4, 2025 11:02 AM

views 17

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मेक्सिकोवर लादलेली अतिरिक्त करवाढ एक महिना विलंबाने होईल लागू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवर लादलेली अतिरिक्त करवाढ एक महिना विलंबानं लागू होईल असं जाहीर केलं आहे. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्याशी द्विपक्षीय स्तरावर मैत्रीपूर्ण चर्चा झाल्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचा खुलासा ट्रंप यांनी केला. फेंटानिल औषधाची अवैधरित्या होणारी तस्करी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रवाह रोखण्यासाठी अमेरिका-मेक्सिको सीमेवर 10 हजार सैनिकांची तैनाती करण्यास सहमती झाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशीही आपण चर्चा करत असल्...

February 3, 2025 2:26 PM

views 18

अमेरिकेमधून येणाऱ्या मालावर शुल्क आकारण्याचा कॅनडा आणि मेक्सिकोचा निर्णय

अमेरिकेमधून येणाऱ्या मालावर शुल्क आकारण्याचा निर्णय कॅनडा आणि मेक्सिको यांनी घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा , मेक्सिको आणि चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे , त्याला प्रत्युत्तर म्हणून या दोन देशांनी हा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेमधून आयात केल्या जाणाऱ्या ३० अब्ज डॉलर किमतीच्या मालावर २५ टक्के शुल्क आकारलं जाईल, असं कॅनडानं घोषित केलं आहे, मात्र मेक्सिकोनं अद्याप तपशील जाहीर केलेला नाहीत. अमेरिकी मालावर प्रत्युत्तरादाखल शुल्क आकारण...