July 28, 2024 7:20 PM

views 26

गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे ४० मार्गांवरची वाहतूक ठप्प

    गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे आज जनजीवन विस्कळीत झालं. पुरामुळे गडचिरोली-चार्मोशी आणि आलापल्ली-भामरागड या मार्गांसह जिल्ह्यातल्या चाळीस मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली. धानोरा तालुक्यात गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक १५४ पूर्णांक २ दशांश मिलिमीटर पावसांची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत १६२ पूर्णांक ९ दशांश टक्के पाऊस झाल्याचं वेधशाळेनं कळवलं आहे. हेमलकसा - भामरागड दरम्यान आलेल्या पुरात अडकलेल्या ३५ नागरिक आणि तीन मुलांना काल एसडीआरएफ आणि महसूल विभागाच्या पथकानं सुखरूप बाहेर काढलं. ...

July 28, 2024 3:40 PM

views 28

भंडारा जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाचे २७ दरवाजे उघडले आहेत. लाखनी तालुक्यात अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालं आहे.   नांदेड इथल्या विष्णुपूरी प्रकल्पाचा १ दरवाजा उघडला असून प्रकल्पातून १५ हजार २९७ क्युसेस पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आलं आहे.

July 21, 2024 7:52 PM

views 26

राज्याच्या विविध भागात आज पावसाचा जोर

राज्याच्या विविध भागात पावसानं आज जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून त्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. मुंबई आणि उपनगरांत आज मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. धेरी पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा अंधेरी सब वे, तसंच दादरच्या हिंदमाता भागात पाणी साचलं होतं. मुंबई आणि उपनगरांत गेल्या ४८ तासांपासून अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ९१ मिलीमीटर पावसाची नो...

July 21, 2024 12:59 PM

views 22

पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भ, छत्तीसगड, किनारी कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मराठवाडा, किनारी आंध्र प्रदेश, यानम आणि तेलंगणमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसच नवी दिल्लीमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान संस्थेने व...

July 6, 2024 7:39 PM

views 29

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल मुसळधार पाऊस

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर याच कालावधीत सोसाट्याचा वारा वाहू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा तर बऱ्याच ठिकाणी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

July 3, 2024 7:07 PM

views 29

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

June 23, 2024 11:22 AM

views 25

कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा

कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी आणि जोराचे वारे वाहण्याचा अंदाज आहे तसंच विदर्भातही जोराच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पिवळा बावटा तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला नारिंगी बावटा जारी करण्यात आला आहे.