July 3, 2024 7:04 PM July 3, 2024 7:04 PM

views 11

भुशी धरणात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा

पाणीटंचाई असणाऱ्या शहरात विकासकाला पर्यायी पाण्याची सोय करण्याच्या, हे खरेदीदाराला करारपत्रात लिहून देण्याच्या आणि हे ‘रेरा’ला कळवण्याच्या सूचना नगरविकास विभागामार्फत देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. चेतन तुपे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. पाणी वितरण व्यवस्था नव्याने तयार करून, पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर देण्यात येत आहे, असंही फडनवीस म्हणाले.  भुशी धरणात पाच जण वाहून गेल्याची घटना दुर्दैवी असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ...