June 20, 2025 3:37 PM June 20, 2025 3:37 PM

views 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धरणगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचं अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, इतर लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी तसंच मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पासाठी शासनाने ३९ कोटी ४६ लाख...

February 6, 2025 9:50 AM February 6, 2025 9:50 AM

views 6

महाराष्ट्रातल्या चार नदीजोड प्रकल्पांचं काम येत्या वर्षभरात सुरू करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्रातल्या चार नदीजोड प्रकल्पांचं काम येत्या वर्षभरात सुरू करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या खुंटेफळ इथं आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाचं भूमिपूजन करताना ते काल बोलत होते.

February 5, 2025 8:57 AM February 5, 2025 8:57 AM

views 47

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज बीड दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन, खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाचा शुभारंभ, आष्टी इथल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ मंदिर समाधी दर्शन आणि समाधी बांधकामाचं भूमिपूजन, तसंच जागतिक खो-खो स्पर्धेतल्या विजेत्या खेळाडूंचा सत्कारही फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

February 4, 2025 3:52 PM February 4, 2025 3:52 PM

views 12

अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट

अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी अनेक अमेरिकन कंपन्या उत्सुक असल्याचे हँकी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.राज्यात ऊर्जा, नव तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, नवनवीन क्षेत्रामधील सहयोगाबद्दल तसंच ऊर्जा क्षेत्रात संधी, विकास आणि पायाभूत सुविधा उभारणीत नवतंत्रज्ञानाचा वापरावर दोघांमध्ये चर्चा झाली.