July 6, 2024 7:23 PM July 6, 2024 7:23 PM

views 13

जोगेश्वरी इथल्या कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी खासदार रविंद्र वायकर यांच्याविरोधातला तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे शाखेचा अहवाल

मुंबईत जोगेश्वरी इथल्या कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्याविरोधातला तपास बंद करण्याचा अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दिला आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी वायकर यांच्यासह त्यांची पत्नी आणि त्यांच्या चार भागिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्यावतीनं यासंदर्भात दाखल करण्यात आलेली तक्रार, अपुरी माहिती आणि गैरसमाजावर आधारित होती, असं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलं आहे. याप्रकरणी दिलेलं पत्र मागे घेण्याचं निवेदन मुंबई महापाल...

July 3, 2024 3:42 PM July 3, 2024 3:42 PM

views 14

शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबईत बैठक

गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामांसाठी विनामूल्य जमिनी मिळवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीनं प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज त्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. अत्यावश्यक बाब म्हणून शेती महामंडळाच्या जमिनीवरच्या पाणी पुरवठा योजनांची कामं मार्गी लावण्यासाठी अटी आणि शर्थींच्या अधीन रा...

June 15, 2024 7:12 PM June 15, 2024 7:12 PM

views 40

विधानसभा निवडणूक अधिक ताकदीनं लढवण्याची महाविकास आघाडीची घोषणा

महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटनांसह छोटे पक्ष मिळून आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित आणि अधिक ताकदीने लढणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले. धार्मिक ध्रुवीकरणाचा निवडणुकीत काहीही परिणाम झाला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. महाविकास आघाडीनं आज मुंबईत संयुक्त परिषद देऊन लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३० जागा निवडून दिल्याबद्दल राज्यातल्या मतदारांचे आभार मानले आहेत. मदत करणारे छोटे...

June 14, 2024 3:05 PM June 14, 2024 3:05 PM

views 36

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात वापरण्यात येणारं स्वयंचलित पर्जन्यमान मापक

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात स्वयंचलित पर्जन्यमान मापक वापरण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन अधिक अधिक सुरक्षित करण्यासाठी ही प्रणाली वापरण्यात येणार असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पावसाची अचूक नोंद ठेवता येईल. या प्रणालीत नोंदवलेल्या पावसाच्या प्रमाणानुसार मध्यवर्ती सिग्नल नियंत्रक प्रणाली काम करणार आहे. या प्रणालीद्वारे एका तासात आणि २४ तासांत पडलेला पाऊस अशा दोन पद्धतीनं नोंद केली जाईल. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अशा प्रकारची ६ पर्जन्य मापक यंत...

June 14, 2024 2:52 PM June 14, 2024 2:52 PM

views 31

सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

मुंबई शहर आणि उपनगरांत आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पावसामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं या वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस नसल्यानं नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली. या संदर्भात अनेक नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सोशल मीडियावर तक्रारी नोंदवल्या. नागरिकांनी केलेल्या या तक्रारींना पोलिसांनी उत्तर देत त्यांच्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहनांचे बिघाड आणि इतर समस्यांमुळे वडाळा, आझाद मैदा...

June 13, 2024 7:37 PM June 13, 2024 7:37 PM

views 15

१८ व्या ‘मिफ’ महोत्सवात २१ मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश

मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा २१ मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात प्रेक्षकांना या चित्रपटांचा आस्वाद घेता येईल.   आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सार्वनिक कौर यांचा अगेन्स्ट द टाइड हा चित्रपट आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेत बिगारी कामगार, भैरवी, भगवान, गुंतता हृदय हे, वूमन ऑफ बिलियन, फेरा, आजोबांचं घर, वैद्यराज, अद्वैताच्या पाऊलखुणा, सहस्त्रसूर्य सावरकर, डोमकावळा - द रावन, भेड चाल, म्हातारा डोंगर हे लघुपट-माहितीपट पाहता येतील...