April 9, 2025 5:34 PM April 9, 2025 5:34 PM

views 12

दुबईच्या उपप्रधानमंत्र्यांनी आज मुंबई शेअर बाजाराला दिली सदिच्छा भेट

भारत दौऱ्यावर आलेले दुबईचे उपप्रधानमंत्री युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक़तूम यांनी आज मुंबई शेअर बाजाराला सदिच्छा भेट दिली. मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरारामन रामामूर्ती यांनी युवराज अल मकतुम आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं. तसंच स्टॉक एक्सचेंजच्या वाटचालीबाबत सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.  

October 8, 2024 3:12 PM October 8, 2024 3:12 PM

views 8

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पोहोचला उच्चांकी पातळीवर

मागच्या काही दिवसांच्या पडझडीनंतर आज दुपारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी उच्चांकी पातळीवर पोहोचले. सेन्सेक्स ३६६ अंकांनी वाढून ८१ हजार ४१६ अंकावर पोहोचला. तर निफ्टी १३१ अंकानी वाढून २४ हजार ९२७ अंकावर पोहोचला.

September 30, 2024 7:31 PM September 30, 2024 7:31 PM

views 8

देशातल्या शेअर बाजारात जोरदार घसरण

गेल्या कित्येक दिवसांपासून उच्चांकी पातळी गाठत असलेल्या देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार घसरण दिसून आली. व्यवहार सुरू झाले तेव्हापासून सुरू झालेली ही घसरण सातत्याने वाढत गेली. सेन्सेक्स दिवसअखेर १ हजार २७२ अंकांनी घसरुन ८४ हजार ३०० अंकांवर आणि निफ्टी ३६८ अंकांनी घसरुन २५ हजार ८११ अंकांवर बंद झाला.  आशियाई बाजारातल्या घसरणीचा परिणाम देशातल्या शेअर बाजारांवर दिसून येतोय. विदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीचा फटकाही बाजाराला बसला. 

September 23, 2024 7:14 PM September 23, 2024 7:14 PM

views 13

शेअर बाजारामधल्या व्यवहारांमध्ये दिवसभरात तेजी

शेअर बाजारामधल्या व्यवहारांमध्ये दिवसभरात तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रातच शेअर बाजारानं आतापर्यंतचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. दुपारच्या सत्रातही तेजी कायम राहिली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८४ अंकांची वाढ नोंदवत ८४ हजार ९८० अंकांच्या नवा उंचीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही१४८ अंकांची वाढ नोंदवत २५ हजार ९३९ अंकांच्या विक्रमी उंचीवर बंद झाला. 

July 15, 2024 7:42 PM July 15, 2024 7:42 PM

views 16

मुंबई शेअर बाजारात चढउतार

शेअर बाजारात आज चढउतार झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सकाळी शुक्रवारच्या तुलनेत १६७ अंकांनी वर उघडला. दुपारपर्यंत बाजार चढे होते. त्यादरम्यान मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं एकदा ८० हजार ८६३ अंकांची नवी उंची गाठली होती. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४ हजार ६३५ उंचीवर पोचला होता. मात्र ही उंची शेवटपर्यंत टिकली नाही.  दिवसअखेर सेन्सेक्स १४६ अंकांची वाढ नोंदवत ८० हजार ६६५ अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८५ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ५८७ अंकांवर बंद झाला.

July 6, 2024 6:16 PM July 6, 2024 6:16 PM

views 5

जून २०२४ मध्ये उघडली ४२ लाखांहून अधिक नवीन डी मॅट खाती

भारतीय शेअर बाजार नवे उच्चांक गाठत असल्याच्या पार्श्वभूमीवर जून २०२४ मध्ये ४२ लाखांहून अधिक नवीन डी मॅट खाती उघडली आहेत. केंद्रीय डिपॉझिटरी सर्व्हिस आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे, डी मॅट खात्यांची एकूण संख्या आता १६ कोटीवर पोहोचली आहे. एका महिन्यात ४० लाखांहून अधिक नवीन डी मॅट खाती उघडण्याची ही चौथी वेळ आहे. गेल्या गुरुवारी मुंबई शेअर बाजार तसंच राष्ट्रीय शेअर बाजाराचा  निर्देशांक आतापर्यंतच्या सर्वाधिक उंचीवर पोहोचला होता.  

June 27, 2024 7:10 PM June 27, 2024 7:10 PM

views 13

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच ७९ हजार अंकांची पातळी ओलांडली

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच ७९ हजार अंकांची पातळी ओलांडली, तर निफ्टीनंही २४ हजार अंकांचा नवा उच्चांक गाठला. दिवसअखेर सेन्सेक्स ५६९ अंकांची वाढ नोंदवत, ७९ हजार २४३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १७६ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ४४ अंकांवर बंद झाला. आजच्या कामकाजात सुमारे ३०० कंपन्यांच्या समभागांनी ५२ आठवड्यातला उच्चांक गाठला तर २६ कंपन्यांच्या समभागांनी ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी नोंदवली.  ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि सिमेंट  क्षेत्रातले समभाग आज चढे राहिले...