June 15, 2024 3:20 PM June 15, 2024 3:20 PM

views 50

वडाळ्यात इमारतीची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

मुंबई उपनगरात वडाळा इथं काल एका तीन मजली इमारतीची भिंत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं बचावकार्य सुरु केलं. या दुर्घटनेत जखमी झालेल्या या दोन महिलांना शीव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं.