December 5, 2024 7:20 PM December 5, 2024 7:20 PM

views 11

६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका सज्ज

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांना सुविधा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पालिकेनं चैत्यभूमी परिसरात नियंत्रण कक्ष उभारला असून रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये अशा सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. चैत्यभूमी परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रीनवर मुख्य कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली आहे. चैत्यभूमी जवळच्या समुद्रात जीवरक्षक बोटी,...

June 27, 2024 6:21 PM June 27, 2024 6:21 PM

views 16

बाणगंगा तलाव परिसरात नुकसान करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई करण्याचे मुंबई महापालिकेचे निर्देश

मुंबईत बाणगंगा तलाव परिसरात दुरुस्तीदरम्यान पायऱ्यांचं नुकसान झाल्यासंदर्भात  कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेनं दिले आहेत. ऐतिहासिक बाणगंगा तलाव आणि परिसरातल्या पुनरूज्जीवन कामांची पाहणी आयुक्त भूषण गगराणी यांनी आज केली. यावेळी पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार उर्वरित टप्प्यातली कामं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसंच तलावातला गाळ काढण्याची सूचनाही त्यांनी दिली.