September 12, 2024 1:50 PM

views 26

‘मुंबई महानगर क्षेत्रः जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकास’ या निती आयोगाच्या अहवालाचं आज मुंबईत प्रकाशन

‘मुंबई महानगर क्षेत्रः  जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकास’ या निती आयोगाच्या अहवालाचं आज मुंबईत प्रकाशन होणार आहे.  यावेळी MMRDA अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकारण आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होईल. यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष क्लॉस श्वाब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  

July 9, 2024 7:10 PM

views 27

मुंबईत पावसाची विश्रांती

राजधानी मुंबई आणि उपनगर क्षेत्रात पावसानं आज विश्रांती घेतली आहे.  रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या ३ दिवसांपासून  कोसळणाऱ्या पावसाचा जोर काल रात्रीपासून कमी झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमी असला तरी पुढचे दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. रविवारी झालेल्या अतिवृष्टीत ७१ कुटुंब बाधित होऊन ३६६ जणांचं स्थलांतर करण्यात आलं.  माणगाव इथं नदीला आलेल्या पुरात एक व्यक्ती वाहून गेली असून त्यांचा शोध सुरू आहे. कुडाळ तालुक्यात पुरामुळे १५८ गावांतल्या ३३२ शेतकऱ्यांच्या भातशेतीचं नुक...