June 18, 2025 3:13 PM June 18, 2025 3:13 PM

views 12

मुंबई- पुणे महामार्गावर भातण बोगद्यात सात ते आठ वाहनं एकमेकांवर आदळल्यामुळे अपघात

मुंबई- पुणे महामार्गावर भातण बोगद्यात आज सकाळी सात ते आठ वाहनं एकमेकांवर आदळल्यामुळे अपघात झाला. या अपघातात १० ते १२ पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल इथं एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये तीन ते चार पोलिस गाड्या, एक एसटी महामंडळाची बस, एक टेम्पो, एक स्कॉर्पिओ आणि एक जीप यांचा समावेश आहे. या सर्व गाड्या मुंबईहून पुण्याकडे जात होत्या. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

July 16, 2024 7:08 PM July 16, 2024 7:08 PM

views 20

मुंबई- पुणे महामार्गावर बस अपघातात ५ जणांचा मृत्यू

मुंबई- पुणे महामार्गावर आज सकाळी झालेल्या बस अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या ४५ प्रवाशांना कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी ७ जणांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीहून पंढरपूरला जाणारी बस ट्रॅक्टरला धडकून दरीत कोसळली.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कळंबोलीतल्या एमजीएम रूग्णालयात भेट देऊन रूग्णांची चौकशी केली. सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत, तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार कर...