November 13, 2024 2:19 PM November 13, 2024 2:19 PM

views 85

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मुंबई जिल्हा निवडणूक यंत्रणेनं उपलब्ध करून दिल्या विशेष सुविधा

आगामी विधानसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ८५ वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावत यावा यासाठी मुंबई जिल्हा निवडणूक यंत्रणेनं विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये व्हीलचेअर, व्हॅन, ईको व्हॅन, दिव्यांग सुलभ बसेस, टॅक्सी, तसंच मतदान केंद्रांत जिन्यांवर चढण्यासाठी सरकत्या व्हीलचेअर यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. या मोफत सुविधा मिळवण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांनी सक्षम ॲपद्वारे आवश्यक मागणी नोंदवावी, असं आवाहन जिल्हाधिकारी तसंच अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी स...