August 26, 2024 8:06 PM August 26, 2024 8:06 PM

views 11

मुंबई – गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई - गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त केला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यांनी आज सार्वजनुक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मुंबई - गोवा महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही कंत्राटदारांमुळे महामार्गाचं काम रखडलं, त्यांच्यावर तसंच संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. खड्डे लवकर भरले जावेत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

July 11, 2024 9:13 AM July 11, 2024 9:13 AM

views 27

13 जुलै दरम्यान मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार

रायगड जिल्ह्यातल्या कोलाडजवळच्या पुई इथल्या नवीन पुलाचा गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं आजपासून 13 जुलै दरम्यान सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या वेळात मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान वरंध घाटदेखील 31 ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची अधिसूचना रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढली आहे. 19 जूनला झालेल्या जोरदार पावसानं दरड कोसळून रस्ता खचून वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद आणि धोकादा...

July 8, 2024 5:52 PM July 8, 2024 5:52 PM

views 19

सिंधुदुर्ग : मुंबई – गोवा महामार्गावरची पावशी इथली वाहतूक सुरळीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून तब्बल १४ तासानंतर मुंबई - गोवा महामार्गावरची पावशी इथली वाहतूक सुरळीत झाली. काल या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ चं एक पथक आज सकाळी कुडाळमध्ये दाखल झालं आहे.  दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी आज पूरग्रस्त गावांना भेट दिली. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीत राणे यांनी प्रशासनाला दिल्या.  आमदार वैभव नाईक यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी केल...