June 18, 2024 8:05 PM June 18, 2024 8:05 PM

views 32

मिफमधे आज भारतीय वन्यजीव माहितीपट आणि संवर्धनाचे प्रयत्न या विषयावर मार्गदर्शनसत्र

१८वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफचा आजचा चौथ्या दिवसही विविध चित्रपटांचं प्रदर्शन, संबंधित विषयांवरची चर्चासत्रं आणि मार्गदर्शनसत्रं, तसंच परिसंवादांनी गाजला. भारतीय वन्यजीव माहितीपट आणि संवर्धनाचे प्रयत्न या विषयावर अल्फोन्स रॉय यांचं मार्गदर्शनसत्र  आज झालं. ॲनिमेशनपटांचा प्रवास आणि तरुण आणि मध्यमवयीनांना पडलेली ॲनिमेशनपटांची भुरळ यावर मुंजल श्रॉफ आणि केतन मेहता यांनी आपापले विचार मांडले. चरित्रात्मक माहितीपट आणि चरित्रपट यांच्यातला फरक राहुल रवैल आणि रॉबिन भट्ट यांनी उलगडून ...

June 15, 2024 7:01 PM June 15, 2024 7:01 PM

views 26

१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन

१८व्या 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना दिला जाणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज केली. चित्रपटांमुळे मनोरंजन तर होतंच, शिवाय आर्थिक वाढीला चालना मिळते आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात, असं ते म्हणाले. भारतीय चित्रपटक्षेत्राच्या वाढीसाठी सरकार वचनबद्ध आहे. माहितीपट, लघुपट, ॲनिमेशनपट निर्मात्यांनी भारतात येऊन चित्रीकरण करावं, असं आवाह...

June 15, 2024 9:22 AM June 15, 2024 9:22 AM

views 47

मिफ महोत्सवातले चित्रपट पहिल्यांदाच मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये दाखवले जाणार

मिफ महोत्सवातले चित्रपट यंदा पहिल्यांदाच मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये दाखवले जाणार आहे. यंदाच्या मिफमध्ये ५९ हून देशातल्या ६१ भाषांमधले १ हजारांहून अधिक चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. पहिल्यांदाच या महोत्सवासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं प्रवेशिका आल्या आहेत. त्यातल्या ३१४ चित्रपटांचा समावेश चित्रपट महोत्सवात झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणीत २५ आणि राष्ट्रीय स्पर्धा श्रेणीत ७७ चित्रपट आहेत. अमृत काळातला भारत या विषयावरच्या चित्रपटांसाठी यंदाच्या मह...

June 14, 2024 11:47 AM June 14, 2024 11:47 AM

views 80

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा २१ मराठी चित्रपट,लघुपट आणि माहितीपटांचा समावेश

मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा २१ मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश आहे. उद्यापासून हा महोत्सव सुरु होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सार्वनिक कौर यांचा अगेन्स्ट द टाइड हा चित्रपट आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेत बिगारी कामगार, भैरवी, भगवान, गुंतता हृदय हे, वूमन ऑफ बिलियन, फेरा, आजोबांचं घर, वैद्यराज, अद्वैताच्या पाऊलखुणा, सहस्त्रसूर्य सावरकर, डोमकावळा - द रावन, भेड चाल, म्हातारा डोंगर या लघुपट- माहितीपटांचा समावेश आहे.