February 5, 2025 4:16 PM

views 21

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक येत्या शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रवारी सकाळी मल्होत्रा व्याजदरांबाबतचे समितीचे निर्णय जाहीर करतील. फेब्रुवारी २०२३ पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवला आहे. 

December 4, 2024 9:42 AM

views 22

मुंबईत केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शताब्दी स्तंभाचं उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते काल मुंबईत केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त शतकमहोत्सवी स्तंभाचं उद्घाटन करण्यात आलं. तसंच संस्थेनं विकसित केलेली दोन नवी तंत्रज्ञानं आणि संस्थेच्या कामाशी संबंधित तीन पुस्तकांचं प्रकाशनही या कार्यक्रमात झालं. भारताला जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यात शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असेल असं सांगून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी कृषी क्षेत्र आहे असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीस...

October 5, 2024 4:13 PM

views 25

इराणी चषकासाठी मुंबईचं विक्रमी १५वं विजेतेपद, मुंबईचा सर्फराज खान ठरला सामनावीर

इराणी चषकासाठी मुंबई आणि शेष भारत यांच्यात उत्तरप्रदेशात लखनऊ इथं झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला, मात्र पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर मुंबईनं विजेतेपद पटकावलं. हे मुंबईचं विक्रमी १५वं विजेतेपद ठरलं आहे. पहिल्या डावातला द्विशतकवीर मुंबईचा सर्फराज खान याला सामनाविराच्या पुरस्कारानं गौरवलं गेलं.

August 14, 2024 6:54 PM

views 28

राज्यभरात तिरंगा यात्रांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

  हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज नवी मुंबईतल्या विविध भागात तिरंगा यात्रा काढण्यात आल्या होत्या. या यात्रांमध्ये विद्यार्थी, महिला, युवक तसंच नागरिकांसह सायकलपटूही मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.   स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक महापालिकेनं तिरंगा पदयात्रा आयोजित केली होती. या पदयात्रेदरम्यान स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार करण्यासह हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचं आवाहन नाशिकच्या जिल्हाधिका...

July 24, 2024 7:06 PM

views 38

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या सोमवारी मुंबईत विधान भवनात आजी माजी आमदारांना संबोधित करणार

येत्या सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आजी माजी आमदारांना संबोधित करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते, २०१७-१८ पासून प्रलंबित असलेले उत्कृष्ठ संसदपटू आणि सदस्यांना उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते ' वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व ' या पुस्तकाचं प्रकाशन देखील होणार आहे, असं विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी सा...

July 21, 2024 7:52 PM

views 26

राज्याच्या विविध भागात आज पावसाचा जोर

राज्याच्या विविध भागात पावसानं आज जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून त्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. मुंबई आणि उपनगरांत आज मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. धेरी पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा अंधेरी सब वे, तसंच दादरच्या हिंदमाता भागात पाणी साचलं होतं. मुंबई आणि उपनगरांत गेल्या ४८ तासांपासून अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ९१ मिलीमीटर पावसाची नो...

July 13, 2024 9:18 PM

views 33

महाराष्ट्राला जगाचं आर्थिक विकासाचं शक्तीकेंद्र बनवण्याचं लक्ष्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्राला जगातलं आर्थिक विकासाचं सर्वात मोठं शक्तीकेंद्र आणि फिन्टेक राजधानी बनवणं हे आपलं हे आपलं स्वप्न असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात २९ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे, महाराष्ट्र हे समृद्ध भविष्याचं स्वप्न आहे. विकसित भारताच्या ...

July 9, 2024 7:10 PM

views 27

मुंबईत पावसाची विश्रांती

राजधानी मुंबई आणि उपनगर क्षेत्रात पावसानं आज विश्रांती घेतली आहे.  रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या ३ दिवसांपासून  कोसळणाऱ्या पावसाचा जोर काल रात्रीपासून कमी झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमी असला तरी पुढचे दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. रविवारी झालेल्या अतिवृष्टीत ७१ कुटुंब बाधित होऊन ३६६ जणांचं स्थलांतर करण्यात आलं.  माणगाव इथं नदीला आलेल्या पुरात एक व्यक्ती वाहून गेली असून त्यांचा शोध सुरू आहे. कुडाळ तालुक्यात पुरामुळे १५८ गावांतल्या ३३२ शेतकऱ्यांच्या भातशेतीचं नुक...

July 8, 2024 5:55 PM

views 20

पहिल्याच पावसात युती सरकारचं पितळ उघडं पडलं – नाना पटोले

मुंबई आणि उपनगरात अनेक भागात पाणी तुडुंब भरलं असून पहिल्याच पावसात युती सरकारचं पितळ उघडं पडलं आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अपयशाचं खापर पावसावर फोडू नये असंही ते म्हणाले. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाणं अत्यंत गंभीर आहे, सरकारनं काम केलं असत तर मुंबईची ही अवस्था झाली नसती, असं त्यांनी सांगितलं. चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सूत्रं असल्यानं मुंबईसह राज्याला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत, असं ते म्हणाले.

July 8, 2024 5:47 PM

views 21

मुंबई महापालिका आपत्ती नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबईसह राज्यातली पावसाची स्थिती पाहता नागरिकांपर्यंत मदत पोहचवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असून सर्व यंत्रणा २४ तास दक्ष असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात  पाऊस झाल्यानं  त्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महापालिकेनं तयार केलेल्या साठण तलावामुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भा...