August 30, 2024 10:15 AM August 30, 2024 10:15 AM
15
मालवणमधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला गती
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी काल वर्षा या निवासस्थानी विशेष बैठक घेतली. त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी नुकत्याच काही शिल्पकारांच्या भेटीही घेतल्या आहेत. दरम्यान या दुर्घटनेनंतर शासनाने दोन तांत्रिक समित्या स्थापन करण्याची अधिसूचना जाहीर केली आहे. पहिली समिती दुर्घटनेची कारणमीमांसा करण्यासाठी तयार केली आहे तर दुसरी समिती ही त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा...