June 18, 2025 2:16 PM June 18, 2025 2:16 PM

views 11

सुरक्षा कर्मचारी आणि सशस्त्र माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन माओवादी नेते ठार

आंध्र प्रदेशात अल्लुरी सीतारामा राजू जिल्ह्यातल्या कोंडामोडलू वनक्षेत्रात सुरक्षा कर्मचारी आणि सशस्त्र माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आज तीन माओवादी नेते ठार झाले. विशेष क्षेत्रीय माओवादी समिती सदस्य अरुणा, केंद्रीय माओवादी समिती सदस्य गजर्ला रवी उर्फ ​​उदय आणि एओबी विशेष क्षेत्रीय माओवादी समितीची सदस्य अंजू हे माओवादी या चकमकीत ठार झाले . सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून तीन एके-४७ रायफल जप्त केल्या आहेत.

June 21, 2024 8:17 PM June 21, 2024 8:17 PM

views 13

जहाल नक्षलवादी संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेमचं गोंदिया पोलिसांपुढं आत्मसमर्पण

२ हजार १३ सालापासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या, सालेकसा तालुक्यातल्या पोलिसांच्या चकमकीत सहभाग असलेल्या जहाल नक्षलवाद्यानं, गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे. संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम असं आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचं नाव असून तो मूळचा छत्तीसगढचा आहे. शासनानं त्याच्यावर ७ लाखाचं  बक्षिस जाहीर केलं होतं. या माओवाद्यानं जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या समक्ष, नक्षल आत्मसमर्पण योजनेअंतर्गत  आत्मसमर्पण केलं  आहे.

June 15, 2024 2:30 PM June 15, 2024 2:30 PM

views 10

छत्तीसगडमधे सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत आज ८ माओवादी ठार

छत्तीसगडच्या बस्तर परिसरात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत आज ८ माओवादी मारले गेले. अबुझमाडच्या जंगलात माओवादी सक्रीय असल्याची खबर मिळाल्यावरुन ITBP, जिल्हा राखीव पोलीस आणि विशेष कृती दलाच्या संयुक्त पथकानं शोधमोहिम सुरु केली होती. त्यादरम्यान ही चकमक झाली. शोधमोहिम अद्याप सुरु आहे. सुरक्षा दलाचे दोन जवानही चकमकीदरम्यान जखमी झाले.