July 24, 2024 8:09 PM July 24, 2024 8:09 PM

views 12

महिलांच्या आशियाई टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशचा मलेशियावर ११४ धावांनी विजय

महिलांच्या आशियाई टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात बांगलादेशानं मलेशियावर ११४ धावांनी विजय मिळवला. बांगलादेशाच्या मुर्शिदा खातूननं ५९ चेंडूत ८० धावांची धडाकेबाज खेळी केली. तर कर्णधार निगर सुलतानानं ३७ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या. त्यामुळे निर्धारित २० षटकात बांगलादेशानं २ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मलेशियाला २० षटकात ८ गडी गमावून फक्त ७७ धावाच करता आल्या. मलेशियाच्या एल्सा हंटरनं सर्वाधिक २० धावा केल्या.