September 23, 2024 7:40 PM

views 42

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

येत्या १० नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी, अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी अंतिम मुदत येत्या ३० तारखेपर्यंत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी ही माहिती दिली.  या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, इतर तपशील राज्य परीक्षा परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.