November 10, 2024 5:02 PM November 10, 2024 5:02 PM

views 9

मविआचा महाराष्ट्रनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत जाहीर

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज मुंबईत महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा प्रकाशित केला. मुंबईत जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमावर आधारित हा सविस्तर जाहीरनामा प्रकाशित करत असल्याचं मल्लिकार्जुन खर्गे यावेळी म्हणाले. या महाराष्ट्रनाम्यात शेती आणि ग्रामीण विकास, उद्योग आणि रोजगार, पर्यावरणावर आधारित शहर विकास या मुद्द्यांवर आश्वासनं देण्यात आली आहेत. पंचसूत्री कार्यक्रमात प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी ३ लाख रुपयांची मदत, महालक्ष्मी योजनेअंतर्ग...