June 18, 2025 2:18 PM June 18, 2025 2:18 PM

views 1

महाराष्ट्रात नैर्ऋत्य मान्सून पावसाचा जोर

महाराष्ट्रात नैर्ऋत्य मान्सून पावसानं चांगलाच जोर धरला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राजधानी मुंबईत काल रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. राज्य सरकारनं जारी केलेल्या पत्रकानुसार, गेल्या २४ तासांत सर्वाधिक म्हणजे २९ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस मुंबई उपनगर जिल्ह्यात झाला आहे. त्याखालोखाल रायगडमध्ये जवळपास २२ मिलिमीटर, तर पालघरमध्ये २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.   कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाचा जोर ओसरला असला, तरी धरणातल्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पंचगंगेची पा...

June 13, 2025 1:48 PM June 13, 2025 1:48 PM

views 13

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्रातल्या सात जणांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे. यातले पाच जण एअर इंडियाचे कर्मचारी होते. वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल हे पवईचे रहिवासी होते. तर त्यांचे सहकारी दीपक पाठक हे बदलापूरचे रहिवासी होते. डोंबिवली इथल्या रोशनी सोनघरे, पनवेलच्या मैथिली पाटील आणि गोरेगाव, मुंबई इथल्या अपर्णा महाडिक हे कर्मचारीही विमानात होते. सांगली जिल्ह्यातले महादेव पवार आणि त्यांच्या पत्नी आशा पवार हे प्रवासीही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत.  

February 11, 2025 2:28 PM February 11, 2025 2:28 PM

views 5

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १२९ पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदक तालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे. महाराष्ट्राकडे सध्या सर्वाधिक १२९ पदकं असून यात ३३ सुवर्ण, ४८ रौप्य आणि ४८ कांस्य पदकांचा समावेश आहे. सेनादलं ४९ सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर असून कर्नाटक ३२ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

December 7, 2024 10:09 AM December 7, 2024 10:09 AM

views 10

देशभरात नवीन 85 केंद्रीय विद्यालयं होणार सुरु , महाराष्ट्रातील तीन ठिकाणांचा समावेश

केंद्रीय आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीनं देशभरात नागरी तसंच संरक्षण क्षेत्रांतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालयं उघडण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रात अकोला, पुण्यातील एनडीआरएफ परिसर, सुदुंबरे आणि रत्नागिरीतील नाचणे भागात प्रत्येकी एक अशा तीन विद्यालयांचा समावेश आहे. 85 नवीन केंद्रीय विद्यालयांच्या स्थापनेसाठी एकंदर 5 हजार 872 कोटी रुपये 2025-26 पासून आठ वर्षांच्या कालावधीसाठी तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत 1256 केंद्रीय विद्यालयं कार्यरत आहेत, यामध्ये परदेशात मॉस्को, काठमांडू आण...

October 26, 2024 3:30 PM October 26, 2024 3:30 PM

views 3

उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवस अखेर ९९१ उमेदवारांचे बाराशे ९२ उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या चौथ्या दिवस अखेर ९९१ उमेदवारांचे बाराशे ९२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत; ३० ऑक्टोबरला या अर्जांची छाननी होईल आणि ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

October 15, 2024 3:58 PM October 15, 2024 3:58 PM

views 17

केंद्रीय निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकींच्या कार्यक्रमाची करणार घोषणा

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकींची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग आज करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजता नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत या दोन्ही राज्यांचं निवडणूक वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ पुढील महिन्याच्या २६ तारखेला तर झारखंडचा जानेवारीच्या ५ तारखेला संपणार आहे. २०१९मध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होऊन २४ ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. त्यावेळी ६१ पूर्णांक ४ शतांश टक्के मतदान झाल...

July 29, 2024 9:48 AM July 29, 2024 9:48 AM

views 11

कनिष्ठ गटाच्या हॉकी इंडिया विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांना उपविजेतेपद

छत्तीसगडमध्ये झालेल्या कनिष्ठ गटाच्या हॉकी इंडिया विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांना उपविजेतेपद मिळालं आहे. पुरुष गटात हॉकी मध्य प्रदेशकडून महाराष्ट्र हॉकी संघाचा 4-6 असा पराभव झाला; तर महिला गटात मध्यप्रदेश संघानेच पेनल्टी शूट आउटमध्ये महाराष्ट्रावर 4-2 अशी मात केली.

July 28, 2024 6:13 PM July 28, 2024 6:13 PM

views 6

गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस

गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला.    येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

July 3, 2024 8:20 PM July 3, 2024 8:20 PM

views 7

महाराष्ट्रात झिका विषाणू प्रकरण पाहता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची मार्गदर्शक नियमावली जारी

महाराष्ट्रात काही ठिकाणी झिका विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं सर्व राज्यांना मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रात 2 जुलैपर्यंत पुण्यात सहा तर कोल्हापूर आणि संगमनेर इथं प्रत्येकी एक अशा एकूण आठ झिकासंक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांनी झिका विषाणू संसर्गासंदर्भात अधिक दक्षता बाळगावी असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत. विशेषतः झिका संक्रमित गर्भवती मातांची तपासणी आणि गर्भाच्या वाढीवर देखरेख ठेवावी आणि केंद...

June 22, 2024 2:47 PM June 22, 2024 2:47 PM

views 14

महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार – चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. भाजप प्रदेश कोअर कमिटीची बैठक काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झाली. लोकसभा निवडणुकीत जिथेकमकुवत होतो, तिथे अधिक मेहनत करू असं बावनकुळे यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुका, विधानपरिषद निवडणुका आणि महाराष्ट्रातले आरक्षण आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.